आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्यानंतर एनसीबीच्या फर्जीवाडयावर अखेर शिक्कामोर्तब - महेश तपासे

मुंबई (नासिकेत पानसरे):- कार्डिलिया क्रूझ ड्रग्जप्रकरणात आर्यन खानला एनसीबीने आज क्लीनचीट दिली असून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी जो एनसीबीचा फर्जीवाडा उघड केला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर केले ते आज खरे ठरले आहेत. एनसीबीने टाकलेली धाड हीच फर्जीवाडा आहे ते पहिल्या दिवसापासून सांगत होते असेही महेश तपासे म्हणाले.
एनसीबीने भाजप संबंधित नेमलेले पंचही फर्जी होते शिवाय त्याच पंचांनी ते उघड केले होते. एका पंचाचा तर अनैसर्गिक मृत्यूही झाला आहे. शिवाय आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा समोर आली होती त्यामुळे आज आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेले आक्षेप बरोबर होते हे स्पष्ट झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.
0 Comments