सोलापुरात होटगी रोड येथून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणी
.png)
साेलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात होटगी रोड येथून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास महासंघाच्या वतीने मंगळवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.सोलापुरातील महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन, तसेच महाराष्ट्र राज्य सरकार होटगी रोड येथून विमानसेवा सुरू करीत नाही. अडथळे मुद्दामहून काढले जात नाहीत. या सर्व घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी व विमानसेवा सुरू करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी मंगळवारचे आंदाेलन होणार आहे. नुुकतीच या संदर्भात बैठक झाली. त्यात आंदोलनाला वेक अप सोलापूर फाउंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशन, सेव्ह सोलापूर संघटनेने पाठिंबा दिला. सामाजिक संघटना, मंडळे, व्यापारी व व्यावसायिक संघटना, सर्व पक्षीय संघटना या सर्वांना सदर आंदोलनात सामील होण्याचे अावाहन केले आहे.
बैठकीस केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय जाधव, श्रीनिवास वैद्य, आनंद पाटील, सुहास भोसले, प्रतीक खंडागळे, संदीप साळुंखे, अमृता अकलूजकर, नागनाथ मेंगाणे, सुभाष वैकुंठे, रमेश खुने, प्रवीण लामतुरे, विनायक पवार उपस्थित होते.
0 Comments