माजी मंत्री प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त १८ मे रोजी सोलापूरात राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा
नार्थकोट मैदानावर आयोजन अभिजित ढोबळे यांची माहिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व जेष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर महापालिकेच्या समोर नार्थकोट मैदान येथे राज्यस्तरीय " शाहू श्री २०२२" ही बॉडी बिल्डींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजित लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली. याबाबत अभिजित ढोबळे यांनी सांगीतले, की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी शिक्षण घेतले. वाचन व लेखनाच्या आवडीतून त्यांची वक्तृत्व शैली बहारत गेली. ते उत्कृष्ट वक्ते म्हणून महाराष्ट्रात त्यांचा गौरव झाला आहे. गेल्या ४० वर्षाच्या सक्रिय राजकारणात ढोबळे सरांनी महाराष्ट्राच्या शासनात अनेक मंत्रीपदावर उल्लेखनिय कार्य केले. महत्वाचे व दुरगावी निर्णय राज्यासाठी त्यांनी घेतले. बहूजन रयत परिषदेचे संस्थेची स्थापना करुन त्यामाध्यमातून ढोबळे सरांनी महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना उभा केले व अनेक क्षेत्रात संधी दिली. अल्पसंख्यांक . दलित . बहूजन समाजासाठी भरीव कार्य केले आहे.महाराष्ट्रातल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा व अनेक क्षेत्रात ढोबळे सरांनी मौलीक भर घातली.तरुण पिढीला मौलीक मार्गदर्शन करताना विकासाच्या नव्या कल्पना महाराष्ट्रभर राबवल्या तरुणांना स्वावलंबी केले.शैक्षिणिक संस्था, सूत गिरण्या यासह अनेक सहकारी संस्थांची निर्मिती करुन त्याद्वारे परिसराचा विकास घडवला.या मुळे माजी मंत्री लक्ष्मणीराव ढोबळे सर यांच्या १८ मे रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा आयोजित केली आहे. असे स्पस्ट करुन अभिजित ढोबळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर येथे महापालिकेच्या समोर नार्थकोट मैदानावर सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय ' शाहू श्री २०२२ " ही बॉडी बिल्डींग स्पर्धा आयोजली आहे. शाहू शिक्षण संस्था - पंढरपूर तसेच वाघोलीतील महात्मा फूले सूतगिरणी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, की सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत " टायटल विजेता " म्हणून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस तसेच प्रशस्तीपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. बेस्ट पोझर. बेस्ट ईप्रेशर व बेस्टअप कमिंग यासाठी प्रत्ये की ट्रॉफी दिली जाणार आहे या शिवाय ५० ते ५५ किलो वजनी गट, ५५ ते ६० किलो वजनी गट, ६० ते ६५ वजनी गट ११ M ६५ ते ७० किलो वजनी गट, ७० ते ७५ वजनी गट आणि ७५ किलो ते खूला गट अशा सहा स्वतंत्र गटात राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा घेतल्या जाणार आहे. या सर्व सहा गटांत प्रत्येकी पाच क्रमांक निवडण्यात येणार असून अनुक्रमे ५ हजार अशी पहिल्या पाच क्रमांकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. असेही अभिजित ढोबळे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून या स्पर्धेच्या निमित्ताने ढोबळे सरांच्या कार्याला उजाला देवूया, असेही त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे संचालक विजयकुमार पोटफोडे, प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, प्राचार्य अंबादास पांढरे,नजीर शेख उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रमोद काटेसर ( ९४२२३८००३३), राहुल परीटसर ( ९८२३४४४७४७) नरेंद्र कदम सर ( ९९ ६७१८६४२० ) यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे ढोबळे यांनी आवाहन केले आहे.
0 Comments