Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभु सेना संघटनेचा राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा थाटात संपन्न

शंभु सेना संघटनेचा राज्यस्तरीय  कार्य गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा थाटात  संपन्न

           माढा (कटुसत्य वृत्त): महापुरुषांचे  जयंती उत्सव विचाराने प्रेरित व्हायला हवेत.त्याचे विचार डोक्यात घेण्याची सध्या गरज असताना आजची तरुणाई मात्र त्यांना डोक्यावर घेऊन डिजेवर नाचते.

           ही चुकीची  पध्दत सुरु असुन प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊनच जयंती साजरी व्हावी असे मत माढा महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश ढेरे यांनी व्यक्त केले.

           शंभूसेना महाराष्ट्र राज्य  संघटनेच्या वतीने  छात्रविर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त  राज्यस्तरीय छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा रयत  महाविद्यालयात पार पडला.यावेळी प्राचार्य.ढेरे बोलत होते.

           प्रारंभी संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.शंभु सेनेचे युवक अध्यक्ष वैभव सांळुखे यांनी  प्रास्ताविकातुन संघटेनेच्या कार्याचा आढावा मांडला.प्रिन्सी देशमुख या चिमुकलीने संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या राज्यातील २१ व्यक्तिंना कार्य गौरव पुरस्काराने सन्मान पत्र शाल,श्रीफळ फेटा बांधुन 

           सन्मानित करण्यात आले.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण यांनी मनोगतातून यापुढील काळात देखील महापुरुषांच्या जयंत्या विधायक उपक्रमाने  साजरी करणार असल्याचे विषद केले.पुरस्कारार्थी नी देखिल मनोगत व्यक्त केले.मंचावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील,प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण,प्राचार्य सुरेश ढेरे,वैभव सांळुखे,अॅड.शुभम बळे यांचेसह संघटेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रा.अशोक लोंढे तर आभार किरण चव्हाण यांनी मानले.

नोकरी मेळाव्याला प्रतिसाद-

           माढा रयत महाविद्यालय व शंभूसेना संघटेनेच्या वतीने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये  ११ कंपन्या आल्या होत्या.मुलाखती घेऊन आलेल्या उच्च शिक्षण तरुणांना नोकरी देण्यात आल्या. जवळपास ३०० हुन अधिक तरुण वर्ग मेळाव्याला उपस्थित होता.

या २१ मान्यवरांना देण्यात आले  पुरस्कार-

           टेंभुर्णीचे संतोष पाटील (पत्रकार),माढ्याचे संदीप शिंदे(पत्रकार), उपळाई बुद्रुकचे अक्षय गुंड (पत्रकार),सोमनाथ खंडागळे ( पत्रकार )रा. माळेवाडी , ता. माळशिरस ),अतिश गायकवाड ( सामाजिक )( रा. पाथरे , ता. बार्शी ),हेमलता बामणोदकर ( उद्योजक ) रा. जळगाव,फुलचंद नागटिळक ( कवी रा. खैराव , ता. माढा ),बाळासाहेब पाटील ( सामाजिक रा.फुलचिंचोली  ता. पंढरपूर ),अनुज भोसले ( क्रीडा रा. पनवेल ),ह.भ.प.गुरुराज इनामदार ( सांप्रदायिक रा. गार्डी. ता. पंढरपूर ) सुनिल शिंदे (सामाजिक  रा. कारंदवाडी, ता. वाळवा ),रशिद टपाल ( सामाजिक रा. सांगली ),डॉ. बाळासाहेब मावळे (वैद्यकीय रा. जांभुत ता. शिरुर),डॉ.चंद्रशेखर ताटे‌- देशमुख( शैक्षणिक रा. संगम,  ता.  माळशिरस ),श्री.मेसवाल ( अभिनय रा.खेड),राम क्षिरसागर (सामाजिक रा.आडगाव,नांदेड ),  प्रा.रामलिंग सावळजकर (शैक्षणिक रा.अकलुज),विद्या बळे(शैक्षणिक  रा. माढा ),ज्योतीताई भुजंगे(उद्योजक रा. पंढरपूर ),ललितकुमार आगवणे ( सामाजिक रा. नारायणपेठ , ता . हवेली ),सेवानिवृत्त कृष्ठरोग तंत्रज्ञ यु. एफ. जानराव ( माढा ).

Reactions

Post a Comment

0 Comments