पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

पुणे (कटुसत्य वृत्त):- जून 2022 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 6 आणि 7 जून रोजी खेड, 13 आणि 14 जून रोजी मंचर, 20 आणि 21 जून रोजी जुन्नर, 27 आणि 28 जून रोजी वडगाव मावळ आणि 29 जून रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 2 जून 2022 रोजी सायं. 5 वाजता कोटा उपलब्ध उपलब्ध होणार आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment