Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभुराजे लिखित बुधभूषण ग्रंथ पालखी सोहळयाला उत्तम प्रतिसाद

 शंभुराजे लिखित बुधभूषण ग्रंथ पालखी सोहळयाला उत्तम प्रतिसाद 





कुर्डूवाडीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी 

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील बस स्थानका समोरील छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्था प्रणित रिस्क ग्रुपचे अभयसिंंह जाधव यांच्या वतीने जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. प्रारंभी शंभूराजांच्या मूर्तीची स्थापना व पूूजा बावीचे युवा नेते मुन्नाराजे मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी अँड.शिवराज भोसले,माजी नगरसेवक आयुब मुलाणी,मावळा प्रतिष्ठान चे श्रीकांत पाटील,साम्राज्य आरमार उमेश पाटील,आरपीआय युवक आघाडीचे जितेंद्र गायकवाड,महाराज ग्रुपचे बबलू बागल,काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हमीद शिकलकर, विजयकुमार देशमुख युवा मंचचे संस्थापक संतोष क्षिरसागर,नाभिक समाजाचे नेते सुधीर गाडेकर,सागर गोफणे,मनसेचे आकाश लांडे, संस्थेचे अध्यक्ष अभयसिंह जाधव आदी मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते.

बुधभूषण ग्रंथ पालखी सोहळयाला उत्तम प्रतिसाद.. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या  बुद्धभूषण या हस्तलिखित ग्रंथाची दिंडी दि.१४ मे रोजी जयंती दिनी.सायं ५ वा.छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बस स्टँड समोरुन काढण्यात आली.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशाताई टोणपे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ग्रंथाची पूजा करून या पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.यावेळी मध्यवर्ती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला युवा नेते श्रीकांत बागल,रासपचे अभिजीत सोलंकर,शिवबसव प्रतिष्ठान चे सागर कोल्हे,आकाश लांडे,संदीप भराटे,शिवस्वरूप महिंगडे,यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या पालखी सोहळ्याचे आगमन गांधी चौकामध्ये होताच भक्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ भराटे यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्त लिखित बुधभूषण या ग्रंथ दिंडी वर पुष्पवृष्टी करून पालखी चे स्वागत करण्यात आले.यावेळी शंकर बागल,अनिल आबा गवळी,बबलू कांबळे,राजेंद्र वाल्मिक,संजय अस्वरे,पिंटू सोनवर,नितीन लांडगे,विजय सोनवर,गणेश वायकुळे,धनाजी महिंगडे,गणेश कन्हेरे आकाश वाघ, आदींनी स्वागत केले पालखी सोहळ्याची सांगता समारंभ शिव-साई कॉलनी मध्ये करण्यात आला.ओम सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक संदीप भराटे यांच्या वतीने यावेळी शरबत वाटप व महिलानी शंभूराजे यांच्या वर पाळणा गाऊन पालखीचे स्वागत समारंभ आनंदात साजरा केला.या साठी शुभम सुर्यवंशी,अंकुश शिंदे,श्रीकांत चोपडे,शुभम दहिदुले,युवराज शिंदे,विशाल शिंदे,रितेश काळे,चेतन लोंणे,सुमित लोंढे,अनिकेत मिरगणे,अक्षय जाधव आदींसह संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments