माढ्यात विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची वाजत गाजत मिरवणुक

माढा (कटुसत्य वृत्त): माढ्यातील मंगळवार पेठेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नव्याने आणण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीची शहरातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी ग्यानबा तुकाराम चा निनाद करीत विठ्ठल भक्त भगवे ध्वंज घेऊन सहभागी झाले होते. बाल वारकरी ही सामिल झाले होते.मंदिरात शुक्रवारी मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
0 Comments