Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोखा राखत चेतनसिंह केदार - सावंत मित्रपरिवाराच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न

 सामाजिक सलोखा राखत चेतनसिंह केदार - सावंत मित्रपरिवाराच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न

             सांगोला (कटुसत्य वृत्त): मुस्लिम धर्मातील रमजान महिन्याला असाधारण महत्व आहे.  त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी २ मे रोजी रोजी सांगोला शहरातील जामा मस्जिद येथे चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवाराच्या वतीने उपवासधारकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे भोंग्यांचे राजकारण सुरु असताना आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असतानाही सांगोल्यात मात्र सामाजिक संदेश देण्यात आला. या इफ्तार पार्टीत शहरातील असंख्य उपवासधारकांनी इफ्तार व जेवणाचा आस्वाद घेतला.

             रमजानच्या महिन्यात उपवासधारकांमध्ये आध्यात्मिक परिवर्तन होऊन मनामनातील स्नेहभाव, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजवणारा माणसाला वाईटापासून, शेकडो मैल दूर ठेवणारा या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच. त्यानिमित्ताने चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवाराच्या वतीने सांगोला शहरातील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे भोंग्यांचे राजकारण सुरु असताना आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असतानाही सांगोल्यात मात्र सामाजिक संदेश देण्यात आला. 

             या इफ्तार पार्टीला माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,  पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, हाजी शब्बीर भाई खतीब ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ, युवक नेते सागर पाटील, हाजी युसूफ मुल्ला, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, मधुकर बनसोडे, तहसीलदार अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, शिवाजीराव गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख कमरूद्दिन खतीब, सुरेश माळी,योगेश खटकाळे, हरीभाऊ पाटील, अरविंद केदार, माजी नगरसेवक जुबेर मुजावर, अनिल खडतरे, अच्युत फुले, विजय राऊत, गजानन भाकरे, शिवाजी बनकर, आनंद घोंगडे, सचिन लोखंडे, वसंत सुपेकर, संजय केदार, दत्ता टापरे, संजय देशमुख, अफजल शेख, अनिल उर्फ बंडू केदार, सुरेश चौगुले, तोहिद मुल्ला, दिलावर तांबोळी, माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला, उस्मान इनामदार,सय्यद खतीब, निसार मुलाणी, सर्फराज तांबोळी, सौदागर केदार, आनंद फाटे, विष्णूपंत केदार, समाधान पाटील, बाळासाहेब केदार, दत्ता जाधव, दीपक केदार, सोयजीत केदार, अजित केदार, राहुल केदार, राजू शिंदे, शंकर केदार, धर्मा केदार यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments