बालविवाह रोखणेकामी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे - सुशिलकुमार भोसले


बेंबळे (कटुसत्य वृत्त): टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मोठा सजा असलेल्या बेंबळे येथे बाल विवाह प्रतिबंधक उपाय योजनेसंदर्भात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस सहायक निरीक्षक सुशीलकुमार भोसले, गावचे पालक अधिकारी या नात्याने म्हणाले की प्रत्येक ग्रामपंचायतीने बालविवाह प्रतिबंधक ठराव ग्रामसभेत मंजूर करून घ्यावा. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की बालविवाह प्रतिबंधक तरतुदी ,कायदा, शिक्षा याची प्रत्येक घराघरातून माहिती पाहिजे. बालविवाह रोखणे, मुलींना शिक्षित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अनुचित प्रकार घडत असल्यास पोलीस प्रशासनापर्यंत माहिती पोहोचवावी व तात्काळ 112 नंबर डायल करून कळवावे. याप्रसंगी सरपंच विजय पवार यांनी ग्रामसभेत ठराव करून घेण्याचे मान्य केले व आमचे भागात बाल विवाह होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन दिले. या कार्यक्रमास कॉन्स्टेबल संजय भानवसे तुकाराम माने-देशमुख, खंडागळे मेजर ग्रामसेवक मधुकर माने सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर्स अंगणवाडीसेविका व जेष्ठ नागरिक आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस सहायक निरीक्षक सुशील कुमार शिंदे यांचे हस्ते गोळाफेक स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या मंगेश पवार यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक माने यांनी केले.
0 Comments