राजर्षी छत्रपती शाहुराजांची विचार धारा समाजात मराठा सेवा संघानी रुजवली - प्रशांत पाटील

सोलापूर (कटूसत्य):- लोकराजा छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची विचारधारा समाजामधे रुजवन्याचे कार्य गेली तीस वर्ष मराठा सेवा संघ करत आहे. आज राजर्षी शाहु महाराजांचा शतक स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील बोलत होते. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेण्यात आली व नंतर राजर्षी शाहू महाराजाःच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
आज समाजा समाजामधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे पण शाहु महाराजांचा समतेचा संदेश मराठा सेवा संघाने समाजात रुजवुन समाज जोडण्याचे कार्य केले आहे. राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला खऱ्या अर्थांने गरज आहे. शाहू महाराजांनी शिक्षण, अंधश्रद्धा निर्मुलन, उद्योग व्यवसायास चालना, क्रीडा व सांस्कृतिक विकास, शेती व्यवसायासाठी पाणी पुरवठा नियोजन, आदी विषयांनी समाज जागृती व प्रबोधनाचे काम केले. मराठा सेवा संघाने याच आदर्शावर तेहतीस कक्षांची स्थापना करुन बहुजन समाजाचा विकास होण्यासाठी बांधणी केली व समता प्रस्थापीत करुन शाहू महाराजांचे विचार समाजात रुजविले. म्हणुनच आज महाराष्र्टातील जातीय तेढ कमी झाल्याचे दिसुन येते आजचा व महाराष्ट्र आपणास शांत दिसतो आहे असे विचार राजर्षी शाहु महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमीत्त व्यक्त केले . या कार्यक्रम प्रसंगी मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रा संजय जाधव शहराध्यक्ष सदाशिव पवार , वधुवर कक्षा चे जिल्हाध्यक्ष गोवर्धन गुंड,खजिनदार आर पी पाटील, शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा जिवन यादव, प्रा लक्ष्मण महाडीक, वधुवरचे राम माने , नागनाथ पवार आदी उपस्थीत होते.
0 Comments