Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न..!

आदर्श मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न..! 

            कुर्डूवाडी :- माढा परिसरातील नीट परीक्षेतील यशवंत कु.प्रांजली ढेरे व सुयश आडकर यांचा सन्मान आदर्श संस्थेतर्फे करण्यात आला.या प्रसंगी ११वी व १२ वी नीट,जिई मध्ये यशप्राप्तीसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करायचे हे त्या दोघांनी स्वानुभवातून कथित केले.

            ए.पी.एस.फाउंडेशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा पहिल्या गुणगौरव सोहळ्याचे औचित्य साधून रविवार दि.८मे रोजी डॉ. मुंडेगावकर यांच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता दहावी नंतर पुढे काय या विषयावर डॉ.मुंडेगावकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थी व पालकांना मिळाले.

            त्यानंतर ए.पी.एस.फाऊंडेशन अकॅडमी मधील या शैक्षणिक वर्षातील प्रथम तीन क्रमांक संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र,गुलाब पुष्प व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

            या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भांगे डी. आर.यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शकिलाबी सय्यद यांनी केले.तसेच ए.पी.एस.फाऊंडेशन अकॅडमीचे पुढील वर्षीचे नियोजन संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ.पूजा सुरवसे यांनी सादर केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी जनसामान्यांच्या पाल्यांनाही अत्यंत अत्यल्प फी मध्ये उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने ए.पी.एस.अकॅडमी व जुनिअर कॉलेज ची उभारणी करण्यात आली असून अल्पावधीतच आम्ही आमचे इप्सित साध्य करू असे आपल्या मनोगतात सांगितले. 

            या प्रसंगी डॉ. राजकुमार आडकर,सीबीएसई चे विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे,ए. पी.एस.अकॅडमीचे विभाग प्रमुख शिंदे बी.आर,मार्गदर्शक शिक्षक भोसले एस.जी,भांगे डी.आर,विद्यागज,यु.एफ,आध्ये के.ए,रणपिसे पी,भोसले डी.एम व पालक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments