महापालिकेला लळा विदेशी वृक्षांचा!
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पर्यावरण साखळीला कोणताही फायदा नसलेली झाडे मुळासकट काढून देशी वृक्ष वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय वनविभागने घेतला असून, त्याप्रमाणे कार्यप्रणाली सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेच्या रोपवाटिकेत अजूनही सप्तपर्णी या विदेशी वनस्पतीची रोपे उपलब्ध आहेत. देशी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देत विदेशी वृक्षलागवड पूर्णपणे बंद करण्याऐवजी आजही ही रोपे उपलब्ध होत आहेत.ग्लिरिसीडीया (उंदीरमार), काशीद, गुलमोहर, सप्तपर्णी, रेन ट्री या वनस्पती भारतीय पर्यावरण परिसंस्थेला पोषक नाहीत. या वृक्षांची वाढ झपाट्याने होते; मात्र शेजारील इतर देशी झाडांना त्या मारक ठरतात. केवळ शोभेच्या या वनस्पतीचे लाकूड ठिसूळ व मुळेही कमजोर असतात. यामुळे वादळी पावसात ही झाडे लवकर उन्मळून पडतात. ही झाडे विदेशी असून खूप पूर्वीच भारतात स्थलांतरीत झाली आहेत. आता या झाडांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. अगदी चार वर्षांत ही झाडे फुलांनी बहरतात. यामुळे ती अधिक लोकप्रिय झाली. मात्र, या झाडावर अपवादात्मक परिस्थितीतच पक्षी घरटे करतात. पक्षी, मधमाशा यांना काहीच फायदा नसलेल्या या वृक्षांमुळे थेट पर्यावरण परिसंस्थेलाच नख लागत असल्याने या वृक्षांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. असे असताना, महापालिकेनेही देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. महापालिकेकडून मागील पाच वर्षांत कुठेही सप्तपर्णी, गुलमोहर ही झाडे लावण्यात आली नाहीत. मात्र, महापालिकेच्या रोपवाटिकेत ही रोपे आहेत. जुळे सोलापूर परिसरात एका नागरिकाने महापालिकेच्या रोपवाटिकेतून आणलेल्या सप्तपर्णीची लागवड केली आहे
0 Comments