बेंबळे येथील डॉक्टर योगेश पवार यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित

बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे तालुका माढा येथील रहिवासी असलेले डॉ योगेश दत्तात्रय पवार यांची सोसायटी फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रीसर्च आँन पोमोग्रेनेट, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मार्फत दिल्या जाणाऱ्या यंग सायंटिस्ट पुरस्कार २०२१ साठी निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवरचा हा पुरस्कार डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ आर ए मराठे यांच्या हस्ते डॉ योगेश दत्तात्रय पवार यांना प्रदान करण्यात आला यावेळी कृषी विद्यापीठातील इतर मान्यवर उपस्थित होते. डाळिंब उत्पादन आणि तंत्रज्ञान विस्तार या विषयावरील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. योगेश पवार यांचे प्राथमिक शिक्षण बेंबळे येथे झाले असून हॉर्टिकल्चर चे शिक्षण फलटण येथे झाले आहे तसेच पदवीधर , द्विपदवीधर व डॉक्टरेट चे शिक्षण सरदार वल्लभ भाई पटेल सरदार कृषी नगर दांतीवडा कृषी विद्यापीठ गुजरात येथे झाले.डॉ योगेश पवार सध्या सरदारकृषिनगर दांतिवाडा कृषि विद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विषयामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बेंबळे येथील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक दत्तात्रय भानुदास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. या पुरस्काराबद्दल योगेश पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments