अशोक कामटे संघटनेच्या निवेदनाची खा. डॉ .जयसिद्धेश्वर स्वामी यांनी घेतली दखल
सांगोला (कटुसत्य वृत्त): शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वीच सोलापूर- मिरज या मार्गावरील रेल्वे सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत सोलापूरचे खासदार डॉ .जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी घेतली असून या निवेदनातील तात्काळ सूचना निकाली काढण्याचे मध्य रेल्वे विभाग सोलापूर येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे . कोरोना कालावधीत बंद केलेल्या सोलापूर -मिरज -सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर- कोल्हापूर- सोलापूर या रेल्वे लवकरच सुरू करणार असल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे ,उर्वरित बंद रेल्वेगाड्या देखील लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने शहीद कामटे सामाजिक संघटनेच्या समितीस कळवले आहे. सदरील समस्या, बाब स्थानिक व जिल्हा दैनिक वृत्तपत्रातील पाठपुराव्यामुळे किती गरजेचे आहे हे सर्वज्ञात झाल्यामुळे त्याची मागणी जोरदार झाल्याने संबंधित विभागाने याची दखल घ्यावी लागली याकामी सर्व दैनिकांचे सहकार्य लाभले.
यावेळी अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष खासदार महास्वामीजी यांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधितास कार्यवाही करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी यांनी सांगितलेल्या रेल्वेच्या संपूर्ण समस्या जाणून घेतल्या अशोक कामठे संघटना पाठपुराव्याचे कौतिक करून संघटनेच्या कार्यात त्यांनी आशीर्वाद दिले .
यावेळी संघटनेचे संस्थापक निलकंठ शिंदे सर दिग्विजय चव्हाण ,प्रा.आचार्य खानापुरे, कोकरे सर, जाधव सर यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
यापुढील काळात देखील शहीद अशोक कामटे संघटना रेल्वेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
0 Comments