शिराळा येथे होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

परंडा (कटुसत्य वृत्त): परंडा तालुक्यातील शिराळा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जयंती निमित्ताने (दि३१) मे ते (दि४) जून पर्यंत भव्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक राजमाता युवा मंच शिराळा यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
जयंतीनिमित्त (दि३१) मे रोजी सकाळी१०:०० वाजता रामेश्वर नगर शिराळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आयोजकांकडून करण्यात येणार आहे.
(दि१) जून रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत शिवशाहीर शरद नवले यांच्या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.(दि२) जून रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प.निलेश महाराज कोरडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे (दि३)जून रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कोमल पाटोळे यांच्या सांस्कृतिक कला मंचाचे आयोजन करण्यात आलेले आहे.आणि शेवटच्या दिवशी म्हणजे (दि४) जून रोजी रामेश्वर नगर येथून दु ४ ते संध्याकाळी ९:३० या वेळेत संपूर्ण शिराळा गावातून अहिल्यादेवींच्या प्रतिमेची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे,तरी कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे राजमाता युवा मंच कडून आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments