Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील भांगे, तर उपाध्यक्ष पदी लिनाताई राऊत

सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील भांगे, तर उपाध्यक्ष पदी लिनाताई राऊत 

           माढा (कटुसत्य वृत्त): सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हापरिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील भांगे यांची तर उपाध्यक्ष पदी लिनाताई राऊत यांची बिनविरोध निवड झाली.

           व्यवस्थपन समितीची निवड प्रक्रिया अध्यक्ष उपाध्यक्षासह समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी प्रशालेत नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.यात बिनविरोध निवडी पार पडल्या.११ व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पदाधिकार्यांचा सत्कार यावेळी अॅड. मिनल साठे व मुख्याध्यापक नागेश खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.इयत्ता ५ वी ते ८ वी च्या वर्गातून ११ सदस्य बिनविरोध निवडण्यात आले.गत वर्षभरात शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या  विविध कामामुळे पुन्हा एकदा धैर्यशील भागे यांना अध्यक्षपदाची  संधी देण्यात आली आहे.शाळा विकासा बरोबरच गुणवत्तेची परंपरेच्या जबाबदारी  सक्षमपणे पार पाडणार असल्याचा  विश्वास धैर्यशील भांगेनी निवडीनंतर बोलताना  व्यक्त केला.

           याप्रसंगी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती नाना साठे,नितीन  साठे,महेश भांगे,रूपाली भांगे,कुमार बनसोडे,पर्यवेक्षक के.डी यादव,पत्रकार मदन चवरे, बापु माळी आदी सह मोठ्या  संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत डुचाळ यांनी केले तर सर्वांचे आभार पर्यवेक्षक के डी यादव यांनी मानले.

           निवड झालेले समिती सदस्य पुढील प्रमाणे -धैर्यशील भांगे,लीनाताई  राऊत,अनिता  गलांडे,जयश्री माळी,रूपाली कांबळे,सुप्रिया बंडगर,देविदास  भांगे,अंकुश गोरे,दिनेश भांगे,महेश भाजीभाकरे,प्रवीण  राऊत.
Reactions

Post a Comment

0 Comments