ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 19, 2022

ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश...

ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश...

             मुंबई (नासिकेत पानसरे):- अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के - पाटील आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. 

             ताराचंद म्हस्के - पाटील यांनी मागील अनेक वर्षे पत्रकारिता करताना परखड मते मांडण्याचे काम केले आहे असे अजित पवार म्हणाले. या मान्यवरांचे नगर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी पक्ष संघटना बळकट होण्यासाठी नक्कीच सहकार्य मिळेल. पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम होईल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी हा पक्ष प्रवेश प्रभावी ठरेल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त करून त्यांचे पक्षात स्वागत केले. 

             या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages