Hot Posts

6/recent/ticker-posts

अनाधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

अनाधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

            पुणे (कटुसत्य वृत्त): जिल्ह्यातील सर्व अनाधिकृत शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून जिल्ह्यातील दोन शाळांचे वर्ग अनधिकृत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.  त्यामुळे ए.एम.एस. इंग्लिश मिडिअम स्कूल, चाकण ता. खेड या शाळेतील इयत्ता नववी ते दहावी वर्गामध्ये आणि  लेडी ताहेरुनहिस्सा इनामदार हायस्कूल चेतना हौसींग सोसायटी वडगाव शेरी या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments