Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

माढ्यात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

           माढा (कटुसत्य वृत्त): माढ्यात राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा २९७ वा जन्मोत्सव  साजरी झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन सोहळा पार पडला.नगराध्यक्षा अॅड.मिनल  आहे,दादासाहेब साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,शिवाजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी स्वराजली खरात,मृणाल खरात या शालेय मुलींनी होळकर यांच्या जिवनपटावर मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी दादासाहेब साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,रासपाचे माऊली हळणवर,सपोनि शाम बुवा,शिवाजी कांबळे,नगरसेवक शहाजी साठे,ऋतुराज सावंत,नगरसेवक अरुण कदम,

           अजिनाथ माळी,विकास साठे,आनंद भांगे,शिवाजी जगदाळे,मुन्ना साठे, शिवाजी माने,दिनेश जगदाळे,अमोल खरात,भैय्या खरात,स्वप्निल खरात,अरविंद खरात,सचिन सापटणेकर,गोरख वाकडे,मोहन देवकते,संतोष माने  आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन मोहन देवकते यांनी केले.उंदरगावात राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानने जयंती साजरी केली.गावातुन सामाजीक संदेशाचे फलक घेऊन विद्याथ्याॅनी  वाजत गाजत रॅली काढली.यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत घोड्यावर  बसून विद्यार्थीनी रॅलीत सहभागी झाल्या.आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.१ जुनला गितांजली  अभंग यांचे किर्तन तर २ जुनला महाप्रसाद व मिरवणुक पार पडेल. 

Reactions

Post a Comment

0 Comments