Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल मीडिया वर विकृत लिखाण करणाऱ्या केतकी चितळेला कठोर शासन व्हावे : राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे

सोशल मीडिया वर विकृत लिखाण करणाऱ्या केतकी चितळेला कठोर शासन व्हावे : राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे

           मुंबई, (कटुसत्य वृत्त): अभिनेत्री केतकी चितळे हीने परवा संध्याकाळी देशाचे नेते, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट/मजकूर लिहील्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले, उमटत आहेत. सोलापूरमध्ये देखील आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलला केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड पाटील, शहराध्यक्षा सुनीता रोटे, शहर कार्याध्यक्षा श्रीमती लता ढेरे, सुवर्णा शिवपुरे, साधना राऊत, रुबीना खान, माया जाधव, देवशाला जाधवर, ताकभाते ताई, आनिषा नालावडे उपस्थित होत्या.

           आदरणीय शरद पवार हे देशाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर ही  अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात महिला आरक्षण, महिला धोरण, महिला आयोग या सारख्या निर्णयामुळे अनेक महिलांच्या कर्तृत्ववाला व्यासपीठ मिळाले आहे. शरद पवार यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्राचे बापपण घेतले आहे. असे असताना ही विक्षिप्त केतकी चितळे सोशल मीडियावर शरद पवार यांच्या विषयी विकृत लिखाण टाकते, ही अत्यन्त निंदनीय बाब आहे. केतकी चितळेच्या चेहऱ्यामागे असणारी विकृत मानसिकता ठेचायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस कायम सज्ज आहे. त्याआधी 

           मानसिक संतुलन हरवलेल्या केतकी चितळेला कठोर शासन व्हावी अशी प्रतिक्रिया प्रा.कविता म्हेत्रे यांनी यावेळी दिली.

           याच अनुषंगाने सर्व महिला पदाधिकारी यांच्या सहीनिशी तक्रार अर्ज सदर बझार पोलिस स्टेशन येथे देखील देऊन गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments