माकप कडून मार्शल लॉ स्मृती दिन साजरा
.png)
देश पुन्हा गुलामीत जाणार नाही - कॉ.नरसय्या आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चार हुतात्म्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि क्रांतिकारक कार्याची शिदोरी दिली.म्हणूनच इतिहासात सोलापूर चा शोलापूर ,सोलापूर कम्युन अशा शब्दांत गौरवाचे बिरुदावली लाभले. सोलापूर शहर जिल्ह्याला स्वातंत्र्य आणि कामगार चळवळीचा वारसा आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडून हे स्वातंत्र्य मिळवून दिले ते जतन करूया पुन्हा देश गुलामीत जाणार नाही यासाठी संघर्ष करावा लागेल. अशा शब्दांत सभेत स्फुल्लिंग चेतावले.
सोमवार 9 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली दत्त नगर पक्ष कार्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहास आणि मार्शल लॉ ला 92 वर्षे पूर्ण झाली आहेत.हे या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा धगधगता जिता जागता इतिहास प्रत्येक भारतीयांना समजला पहिजे. यासाठी मार्शल लॉ स्मृती दिन साजरा करून वीर हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना आडम पुढे म्हणाले की,मार्शल लॉ ची आठवण करून देताना आडम मास्तर यांचे वडील कॉ.नारायणराव आडम या चळवळी दरम्यान कोर्टाच्या विजेच्या तारा जाळल्या त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम केली पण ते पोलिसांना चुकवत तब्बल तीन महिने भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीचे कार्य केले.
यावेळी युसुफ शेख मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी, रा गो म्हेत्रेस आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर ऍड.एम.एच.शेख, सिध्दप्पा कलशेट्टी, युसूफ शेख मेजर, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे रा गो म्हेत्रेस,अनिल वासम आदी उपस्थित होते.
0 Comments