चिंतामणी विद्या मंदिर थेऊर येथे उन्हाळी संस्कार शिबिर संपन्न

थेऊर (कटुसत्य वृत्त): प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी ईश्वरीय विद्यालय राजस्थान माउंट आबू यांच्या वतीने उन्हाळी संस्कार शिबिर स्थळ- चिंतामणी विद्या मंदिर थेऊर येथे संपन्न झाले. दिनांक 2 मे ते 4 मे 2022 यादरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे उद्बोधनचे कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात विविध विषयांवर संस्कार घडविण्यात आले. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमार- कुमारी ईश्वरीय विद्यालय राजस्थान माउंट आबू. विद्यालय ( प्रमुख संचालीका सातववाडी केंद्र,हडपसर ) सीमा दीदी, श्यामल दीदी, शालन दीदी,श्री. कोलते सर,सौ. रोटे मॅडम,सौ.कानकाटे मॅडम, विनोद सर, श्री.भरीत सर, पठाण सर, जढर सर, मयूर कुंजीर, तुकाराम भोसले, अजित कदम सर, डॉ. सचिन आरु (आरोग्यधाम कोलवडी) व अनेक संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक श्री.खरात सर इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.नेवाळे सर यांनी सर्वांचे आभार मानले. उत्तम सूत्रसंचालन सौ.रोटे मॅडम यांनी केले.
0 Comments