Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच होणार बैठक

आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच होणार बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची आग्रही मागणी

            पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- पश्चिम महाराष्ट्रात आदिवासी महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाच्या अडचणी व प्रलंबित प्रश्नांवर श्री अशोक निंबर्गी व श्रीकांत शिंदे यांनी प्रभावी भूमिका मांडत समाजावर कशा पद्धतीने अन्याय केला जातो ,जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देत असताना जाचक अटी घालून समाज बांधवांना कशा प्रकारे वारंवार दाखल्यासाठी व वैधता प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ केली जाते, अधिसंख्य पदावर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार शासनाकडून नोटीस बजावली जाते, तसे न करता त्यांना कायमस्वरूपी त्या पदावर कार्यरत करण्यासाठी बैठक घेतली तर नक्कीच समाजाला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका घेणेबाबत चर्चा करण्यात आली व त्याच चर्चेतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील 15 दिवसाच्या आत महसूलमंत्री, आदिवासी मंत्री त्याविभागातील संबंधित आयुक्त व सचिव व समाजातील प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री दालनात बैठक लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.

            तसेच तरी या बैठकीला महादेव कोळी समाजातील पदाधिकारी यांना बोलावून घेवून त्यांचे मत ऐकून घेवून त्यांच्यावर अनेक वर्षांपासून होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

            या बैठकीस अशोक निंबर्गी सर, नागेश बिराजदार, खडाखडे सर, अमोल परबतराव, किरण शिंदे नाईक आदि उपस्थित होते.

आदिवासी महादेव कोळी समाजाच्या मागण्यांसाठी श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा सुरू

            आदिवासी महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्या व जातप्रमाणपत्र दाखल्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न करीत आहेत त्यास आता यश येत असल्याचे दिसून येत असून लवकरच या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments