शिवसेनेने छत्रपती संभाजीराजेंना पक्ष प्रवेशाची अट घातल्याचा मराठा महासंघाच्या वतीने शिवसेना व संजय राऊतांचा केला निषेध

माढ्यातील शासकीय विश्रामगृहात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप भोरे,सचिव गणेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली.
माढा, (कटुसत्य वृत्त): भुमिका मांडताना संदीप भोरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रहार करुन शिवसेनेवर देखील मविआ मधील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी दबाव टाकायला हवा तिन्ही पक्षाच्या संगनमताने छत्रपतींना उमेदवारी द्यायला हवी होती.आगामी काळात याचे तिन्ही पक्षाना पडसाद दिसल्या शिवाय राहणार नाहीत.शिवसेना नेते संजय राऊतांनी लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणून अपमानित केले.मोर्चा मुका नसता तर मग कळले असते राऊतांना मराठ्यांचा मोर्चा कसा असतो ते.प्रितिज नंदी,नारायण आठवले,राजकुमार धूत,मुकेश पटेल,भरतकुमार राऊत यांना राज्यसभेवर घेताना शिव बंधन बांधण्याची शिवसेनेने अट घातली होती का ? असा सवाल
उपस्थित करीत मग छत्रपतींच्या वारसदारांना शिवसनेने पक्ष प्रवेशाची अट घालणे निषेधार्हच आहे.शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या भुमिका मांडणाऱ्या छत्रपती संभाजीराजे विषयी ही अट टाकण्याची भुमिका घेणाऱ्या पक्षासह आघाडीतील पक्षाचा मराठा समाज विचार करणार.मविआ च्या नेत्याच्या मनात काय कारस्थान सुरु आहे.हे लवकरच समोर येईल.गुरुवारी संभाजी महाराज भुमिका मांडतील त्यानंतर मराठा महासंघ पुढील भूमिका जाहीर करेल.यावेळी जिल्हा सचिव गणेश चव्हाण,माढा तालुका अध्यक्ष धनाजी गोडसे,तालुका उपाध्यक्ष दिपक सुर्वे आदी उपस्थित होते.
हे ही विषयी मांडले पत्रकार परिषदेत-
सारथी संस्थेच्या माध्यमातून बर्याच शैक्षणिक सामाजिक संस्था कार्यरत आहेत.या संस्थेचे कार्य ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी उपक्रम कार्यक्रम राबविणार.
लघु उद्योजकांना अर्थात नव व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून त्यांना व्यवसायात मदत मिळावी प्रोत्साहन मिळण्यासाठी आर्थिक मदत मिळवुन देणार आहोत.सोलापुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ३० ठिकाणी भिती रंगवून सामाजिक संदेश लिहुन समाज प्रबोधन करण्याचे काम केले जाणार असुन याचे काम कुडूॅवाडीतुन सुरु केले आहे.
0 Comments