टेंभुर्णी येथील कृष्णात गिराम गुरुजी यांचे दुःखद निधन

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): टेंभुर्णी येथील सेवानिवृत्त शिक्षक कृष्णात रंगनाथ गिराम गुरुजी यांचे सात मे 20 22 रोजी अल्पशा आजाराने सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले.
गिराम गुरुजी यांनी जि. प.शाळा भोयरे कळमवाडी, ता. बार्शी जि. प. शाळा टेंभुर्णी, जि. प.शाळा चव्हाणवाडी ता. माढा इतर ठिकाणी 37 वर्ष कार्य केले.
एक व्यासंगी शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती ते चव्हाणवाडी टे येथील जि. प.शाळेतून ते 1999 साली प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मागील काही दिवसापासून हृदयाचा त्रास होत असल्याने ते सोलापूर येथील खाजगी हॉस्पीटलउपचार घेत होते.
दिनांक 7 मे रोजी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी जावई दोन सुना नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments