Hot Posts

6/recent/ticker-posts

मिटकलवाडी अंजली खून प्रकरणी दुसरा आरोपी नणंदेस अटक 11 मे पर्यंत पोलीस कोठडी

मिटकलवाडी अंजली खून प्रकरणी दुसरा आरोपी नणंदेस अटक 11 मे पर्यंत पोलीस कोठडी

           माढा (कटुसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथील अंजली सुरवसे आत्महत्या प्रकरणास आरोपी असलेली नणंदेस अटक करून टेंभुर्णी पोलिसांनी माढा न्यायालयासमोर उभे केले असता तिला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

           टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथील अंजली हनुमंत सुरवसे वय 24 हिचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंजली यांच्या नवऱ्यासह सहा जना वरती टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अंजली सुरवसे तिच्या पतीस टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती मात्र पाच जण फरार झाले होते. त्यामुळे पाच आरोपींना पकडण्यासाठी करमाळा विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दोन पथके तयार केली असून त्यापैकी एक पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले असून दुसऱ्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे जाऊन अंजली हनुमंत सुरवसे हिची नणंद आरोपी नामे अंजली बाळासाहेब थिटे राहणार उंबरे वेळापूर तालुका माळशिरस हिला सांगोला तालुक्यातील दहिटणे गावातून ताब्यात घेऊन आज टेंभुर्णी पोलिसांनी माढा न्यायालयासमोर उभे केले असता अंजली बाळासाहेब थिटे राहणार उंबरे हिला 11 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली असून उर्वरित चार आरोपी पकडण्यासाठी आमची दोन पथके तपास करीत असून उर्वरित चार आरोपी आम्ही लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले सदर आरोपी पकडण्यासाठी आम्ही त्यांच्या जवळचे नातेवाईक च्या घरी जाऊन अचानक तपासणी करून कसून चौकशी करत असल्याचे सांगितले असून या आरोपी बाबत कुणाला माहिती असल्यास त्वरित टेंभुर्णी पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केली आहे.

अंजली सुरवसे फरार आरोपी साठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना पो. नि. निंबाळकर 

           करमाळा विभागीय अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सदर उर्वरित आरोपीचा कसून शोध घेणे चालू आहे  प्रत्येकी 1+5 अशी 2 अधिकारी व 10 अंमलदार यांची 2 पथके केलेली असून पाहिजे आरोपी यांचे सर्व बँक अकौंटस सील केलेले आहेत. तसेच तसेच आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. आरोपींच्या जवळचे लांबचे सर्व नातेवाईक यांची कसून तपासणी करण्यात आली असून संभाव्य नातेवाईकांच्या घरी अचानक तपासणी करून आरोपींचा शोध घेतला आहे.

           तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपींच्या संपर्कात आलेल्याना लोकांकडे तपास चालू आहे.  तसेच  पाहिजे आरोपी शोध कामी बीड जिल्ह्यात टीम पाठवून शोध घेतला आहे. तसेच पो नि  स्था गु शा व त्यांचे पथक यांनाही माहिती दिली असून ते देखिल पाहिजे आरोपी त्यांचा शोध घेत आहेत. उर्वरित आरोपींचा अटक करत आहोत .

           सर्व नागरिक यांना आवाहन करण्यात येते की आरोपी विषयी काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला कळवावे. - सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक टेम्भुर्णी

Reactions

Post a Comment

0 Comments