Hot Posts

6/recent/ticker-posts

महिलांना माहेरची साडी देऊन जालिंदर लांडे व कमल जालिंदर लांडे यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

महिलांना माहेरची साडी देऊन जालिंदर लांडे व कमल जालिंदर लांडे यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

             कुरुल (कटूसत्य वृत्त):- कुरूल येथे जिल्हा परिषदांचे माजी कृषी सभापती जालिंदर लांडे यांच्या लग्नाच्या ५० वाढदिवसानिमित्त सौ,राजश्री राजन,पाटील व माजी आमदार राजन पाटील यांच्या  हस्ते केक कापून, जालिंदर लांडे, सौ,कमललांडे, यांचा,नागरी सत्कार करण्यात आला.

             कर्मयोगी जालिंदर भाऊ लांडे अत्यंत बिकट परिस्थितीमधून नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व. गरिबी असल्यामुळे शाळेत सुद्धा जाणता येत नव्हतं.गरीबी काय असते हे अनुभवल्या असल्यामुळे 1985 सालापासून कुरूल मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गरीब श्रीमंत भेदभाव न करता शैक्षणिक साहित्य व कपडे वाटपाचा कार्यक्रम आज तागायत अखंडपणे चालू आहे. तालुक्यातील किंवा गावातील एखाद्या गरजू व्यक्ती मुलीच्या लग्नासाठी मदत मागायला गेले नंतर कधीच मोकळ्या हाताने माघारी पाठवणे जमलं नाही. भाऊ राजकारण करत असताना जो काय निवडणुकीचा कालावधी आहे तोपर्यंत विरोधक आणि निवडणुक संपली की आपला दोस्त अशा प्रकारचे राजकारण आज पर्यंत करत आले आहेत. भाऊंचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असतो. म्हणून तर  कुरुल ग्रामपंचायत वरती २१ वर्ष भाऊंची एक हाती सत्ता आहे. भाऊंचा स्वभाव असा आहे की लहान मुलांनी तर शिवी दिली त्या मुलाला कधीही माघारी  प्रत्युत्तर देत नाही. जो व्यक्तीच्या अंगात हा गुण असतो तो व्यक्ती नक्कीच मोठा होतो.

             कुरुल गावचे सुपुत्र जालिंदर लांडे यांच्या 50 व्या लग्न वाढदिवस मोठ्या जल्लोष मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी लग्न वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्त आलेल्या महिलांना उत्तम क्वालिटीचे माहेरची साडी, म्हणून भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुहास घोडके यांनी केले.

             यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते मा आमदार राजन पाटील व सौ राजश्री राजेंद्र पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे कार्यक्रमास लांडे कुटुबातील  सदस्य मातोश्री लोचना लांडे, सिताराम लांडे, अमर लांडे प्रविण लांडे सह दोन कन्या, सुना, नातवंडे यावेळी शिवसेना नेते  प्रकाश वानकर .  मोहोळ पंचायत समितीच्यासभापती  रत्नमाला पोतदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, उपसभापती अशोक सरवदे, दुध संघाचे उपाध्यक्ष दिपक माळी, उदयोजक यशवंत गुंड ,बाळासाहेब लिगाडे, दादा लिगाडे, सोमनाथ लिगाडे,मोहोळ बाजार समितीचे सभापती अस्लम चौधरी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले उपप्रमुख विनोद आंबरे,पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, रामराजे कदम, कुरुल सौ.सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंप पांडूरंग आबा जाधव, यांच्यासह,कुरुल ग्रामपंचायत सदस्य व सदस्या विविध पक्षांचे पदाधिकारी प्रतिष्ठीत मान्यवर,कॉन्ट्रक्टर आसोसियनचे जिल्हाध्यक्ष दत्ता मुळे, अशोक ढवण शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष आनिल  कादे . भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव  प्रा. माऊली जाधव,  जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, पैलवान,सुरेश जाधव, सरपंच माणिक पाटील, दिलीप पाटील, ,गणेश पाटील,मेजर संतोष जाधव बाळू,लांडे,  भारत जाधव,टी डी पाटील  ,सुनिल आंबरे प्रदीप गिड्डे ,अशोक जाधव, संभाजी पाटील,ज्ञानदेव कदम , बाबुराव  पाटकर,सज्जन तांबोळी, प्रकाश आंबरे ,राजेंद्र लांडे, ग्रा.सदस्य अंबादास गुरव ,ग्रा.सदस्य सुभाष माळी ,संजय भालेराव, समाधान गायकवाड, धनराज चंदनशिवे आदी सह, पत्रकार बंधु  सुहास घोडके, महेश कुलकर्णी, सुभाष शिंदे, कुमार बाळसराफ,अनेक गावातील,सरपंच विविध पक्षाचे, संघटनांचे, पदाधिकार्यासह भागातील , मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी स्वादीष्ठ भोजनाचा स्वाद उपस्थितांनी घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments