10 वी आणि 12 वीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार

मुंबई (कटूसत्य वृत्त):- पोलीसनामा ऑनलाइन दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.मात्र दहावी आणि बारावीचा निकाल जुनमध्येच लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, बारावीचा निकाल जूनच्या दुसर्या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत,तसेच दहावीचा निकाल जूनच्या तिसर्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.दरम्यान, 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर 12 वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडली.परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, काही विषयांची उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आले असल्याचं सागितलं आहे.त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुनमध्येच लागणार असल्याचं म्हटलं आहे.
0 Comments