मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर - सरपंच वनिता सुरवसे

अक्कलकोट (कटुसत्य वृत्त): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भीम नगर गोगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या कार्यक्रम अध्यक्षस्थानी सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे हे होते प्रमूख उपस्थिती उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप, सौ ललिता कलशेट्टी, जगताप, मधूकर सुरवसे, संजय सुरवसे सर, माझी उपसरपंच कलप्पा बनसोडे अनिल मुलगे, सौ कलावती गायकवाड, गौतम बनसोडे, अँड आनंद बनसोडे, शिवशरण सोनकांबळे, श्रिशेल पाटील, अध्यक्ष स्वामीनाथ गायकवाड, सुरेश सोनकांबळे,आदी उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ सोशल फाउंडेशन वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा, स्पर्धा घेण्यात आले होते त्याचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच सौ वनिता सुरवसे म्हणाल्या की, सिद्धार्थ सोशल फाउंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी आयोजित केलेले विविध कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने घेण्यात आले संयोजक नितीन गायकवाड व त्याच्या टीमने खूप छान नियोजन केले आहे त्या बद्दल सर्वाचे अभिनंदन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचार प्रमाणे, शिका, संघटित व्हा संघर्ष करा, आजची युवा पिढी या गोष्टीचे विचार केलं पाहिजे आमचे बंधू उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या यांचे कार्याचे दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्कार मिळाल्या समाजाचे व गावाचे नाव महाराष्ट्र पोचवले आहे याचं स्वाभिमान आहे, आज पर्यंतच्या इतिहासात जे काही प्रलंबित कामे आहेत ते काम करण्यास आम्ही सरपंच व उपसरपंच, प्रयत्नशील आहोत, मागासर्गीय समाजाचे उन्नती व रोजगार निर्मितसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, लवकर या ठिकाणी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितल्या प्रमाणे संविधान भवन प्रस्ताव मजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत, 15% दलीत वस्ती निधी म्हणून शिलाई मशिन, पिको फॉल, शेळी गट वाटप असे विविध उपक्रम भविष्यात राबविण्यात येणार आहे. यावेळी गौतम बनसोडे व मधूकर सुरवसे यांच्या वतीने 500 लोकांना जेवण व्यवस्था करून देण्यात आले होते , गोगावचे सुपुत्र पोलिस खात्यात सेवानिवृत्त झालेले पोलिस फकिरप्पा बनसोडे यांचे बासरी वाद्य संगीत कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वरी कमलाकर सोनकांबळे यांनी भाषण करून सर्वाचे मन जिंकले, संध्याकाळी पाच वाजता उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुक काढण्यात आले यावेळी पंचशील लेझिम पथक आलुर व वागदरी येथील टिपरी संघाच्या वतीने विविध कला दाखविण्यात आले कार्यक्रम सूत्रसंचालन सुरेश सोनकांबळे आभार संयोजक नितीन गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चीतानंद सोनकांबळे,दयानंद गोपीचंद बनासोडे, परमेश्वर गायकवाड,विनोद बनसोडे, नामदेव सोनकांबळे, नामदेव बनसोडे, आकाश गायकवाड, विशाल बनसोडे, सागर गायकवाड रत्नाकर गायकवाड, दयानंद बनसोडे, कलेणी बनसोडे, लक्ष्मण वाघमारे, आदिने परिश्रम घेतले.
0 Comments