वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार;आवक वाढल्याने आता दर कमी आला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 28, 2022

वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार;आवक वाढल्याने आता दर कमी आला

वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार;आवक वाढल्याने आता दर कमी आला

          रत्नागिरी (कटूसत्य वृत्त):- वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार होऊ लागला असून, काढणी प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. जिल्ह्यातील बागायतदारांची वाशी बाजारावरच अधिक भिस्त असल्याने तेथील आवक वाढली आहे. कोकणातून दररोज ७० ते ७५ हजार पेट्या वाशी बाजारात जात आहेत. त्याचवेळी कर्नाटक राज्यातून २५ हजार आंबा पेटी विक्रीसाठी येत असल्यामुळे लाखभर पेट्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही आवक वाढल्याने आता दर कमी आला असून, एका पेटीला बाराशे ते तीन हजार रुपये आकारले जात आहेत.

          हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.अवकाळी पावसातून बचावलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मोहराचा आंबा मार्चपासून बाजारात आला.मात्र,तिसऱ्या टप्प्यात अति डीमुळे परागीकरणाअभावी फळधारणा झालीच नाही. आता चौथ्या टप्प्यातील मोहराचा आंबा तयार होत असून, तो बाजारात येऊ लागला आहे. मात्र, हा आंबा बाजारात येण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.किरकोळ मार्केटमध्येही दर कमी होऊ लागले असून १५ मे पर्यंत आवक भरपूर होणार असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज आंबा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages