शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनची व्याप्ती देशभर वाढवून रुग्णसेवेचा महायज्ञ अखंड सुरु ठेवणार - शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे

राज्यात २६ व्या सोलापूर जिल्ह्यात झाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना
मुंबई, (नासिकेत पानसरे): शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व खा डॉ श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षची स्थापना करमाळा जि सोलापूर येथे करण्यात आली.
जेष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य श्री नरसिंह ( अप्पा ) चिवटे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्ताने करमाळा येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न झाले. यावेळी करमाळा आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर , तहसीलदार मा श्री समीरजी माने साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री सूर्यकांत कोकने , शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे , तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात हृदयविकार (ई सी जी) किडणीस्टोन, कॅन्सर, नाक - कान - घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
यावेली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे, बारामती संपर्क समन्वयक आधीराज कोठाडिया, श्री जितेन्द्र सातव, श्री स्वरूप काकड़े, श्री प्रसाद सूर्यराव, श्री नितिन हिलाल, श्री रविंद्र ननावरे, श्री माउली धूलगंड़े, श्री गजानन नारलावार, श्री रोहित वायभासे, श्री ऋषिकेश देशमुख, श्री सागर झड़े, श्री अरविंद मांडवकर, श्री राहुल भलेरव, दीपाली ताई व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होते.
0 Comments