संभाजी ब्रिगेड ने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 2, 2022

संभाजी ब्रिगेड ने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी

 संभाजी ब्रिगेड ने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी

 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर येथे भगवा ध्वजारोहण करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली.बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारुन देऊन कात टाकत आहे आणि नवविचाराचे स्वागत करून अंगीकार करत आहे.त्याचेच हे प्रतिक असल्याचे शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी सांगितले.


यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडवा हा सण शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येतो त्याकाळी भगव्या पताका उभारण्यात येत असे पण संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या गुढीचे स्वरुप बदलण्यात आले. वारकरी संप्रदाय ची गुढी भगव्या रंगाची आहे. बुद्धाने भगव्या रंगाचे चिवर निवडले. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लाऊन संभाजी राजाना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी,हाच खरा गुढीपाडवा आहे असे आवाहन केले.

यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहरप्रमुख सिताराम बाबर उपाध्यक्ष नागेश पवार उपाध्यक्ष गजानंद शिंदे आर्यन कदम ओंकार कदम बाळासाहेब उबाळे तुषार टोणपै धर्मा माने दत्ता पवार नंदकुमार कोलते मल्लू भंडारी परमेश्वर सुतार प्रसाद गायकवाड राघवेंद्र गोटे महेश माने शाहरुख पटेल  बाळासाहेब वाघमारे वंदन वाघमारे महेश सरवदे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages