Hot Posts

6/recent/ticker-posts

“निसर्ग संवर्धनासाठी प्राधान्यक्रम देणे अत्यावश्यक. ” : कवी रवि वसंत सोनार

 “निसर्ग संवर्धनासाठी प्राधान्यक्रम देणे अत्यावश्यक. ” : कवी रवि वसंत सोनार

बीजगोळ्यांचे वाटप करत साजरा केला वाढदिवस...! 
सोनार दांपत्यांकडून वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश...!

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- “ मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्राधान्यक्रम देणे अत्यावश्यक आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांतर्गत बीजगोळे वाटप कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ वाढत्या शहरीकरणामुळे व इतर अनेक कारणांमुळे मानवी जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे. वृक्षांची संख्या वाढावी म्हणून अधिकाधिक नागरिकांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.”

          सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार यांच्या पन्नासाव्या जन्मदिवसाच्या औचित्याने अभीष्टचिंतन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व स्नेही, आप्तेष्ट, सगे सोयरे, नातलग व मित्रपरिवार यांना पाच हजार बीजगोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये चिंच, बहावा, कडुनिंब, सिताफळ, रामफळ, एरंड या व अशा इतर भारतीय वृक्षांच्या बीजांपासून बनवलेल्या बीजगोळ्यांचा समावेश आहे.

          साहित्य लेखनाबरोबरच बहुआयामी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तसेच निसर्ग संवर्धनासाठी आग्रही असणाऱ्या सेवाव्रती सोनार दांपत्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवि सोनार यांच्या वाढदिवसाला भारतीय वृक्षांच्या बीजांपासून बनवलेले बीजगोळे सर्व स्नेही, आप्तेष्ट, सगे सोयरे, नातलग व मित्रपरिवार यांना स्नेहभेट स्वरुपात देऊन एक स्तुत्य अशी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांनी साजरा केलेल्या अशा वाढदिवसाचे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील निसर्गप्रेमी तसेच इतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक व्यक्त केले जात आहे. सदर अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments