Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा एकसष्टी सोहळा थाटात संपन्न

 माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा एकसष्टी सोहळा थाटात संपन्न



अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- संकटे येत राहणार. तुम्ही लढत राहा. माझ्यावर अनेक संकटे आली पण हरलो नाही. निवडणुकीत पराभव होतो. जनता पुढच्यावेळी पुन्हा तुम्हाला निवडून देईल, विश्वास राज्याचे अन्न व नागरी असा पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. शुक्रवारी, अक्कलकोट येथे माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा एकसष्टीनिमित्त ६१ किलोचा हार आणि चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील,आमदार संजयमामा शिंदे, एम. वाय. पाटील, माजी आमदार बी. आर. पाटील, दीपक साळुंखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, अमोलराजे भोसले, चेतन नरोटे, शिवराज म्हेत्रे, संजय देशमुख, शीतल म्हेत्रे, दुधनी समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, स्नेहल म्हेत्रे, वैशाली म्हेत्रे, अन्नपूर्णा म्हेत्रे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत गौरव समितीचे गौरव स्वागताध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केले. प्रास्ताविकातून समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. भुजबळ म्हणाले, अक्कलकोट तालुक्याच्या आजवरच्या इतिहासावर प्रकाश टाकला तर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा लक्षात येते. याची प्रचिती आम्हाला दिसून आली आहे. येथील जनतेच्या आयुष्यमानात त्यांच्यामुळे मोठा बदल झाला आहे. म्हणून संकटे आली तरी डगमगू नका, अक्कलकोट तालुक्याच्या महाविकास विकासासाठी आघाडीचे संपूर्ण सहकार्य म्हेत्रे यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले, मी आणि म्हेत्रे अनेक चांगले मित्र दिवसांपासूनचे आहोत. त्यांचे काम मी जक पाहिले आहे. म्हेत्रेंकडे पाहिले असता ते एकसष्टीचे दिसत नाहीत. कामाच्या बाबतीत तरूणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात आहे. जलसिंचनाच्या त्यांनी केलेले काम बाबतीत तालुक्यासाठी पिढ्यानपिढ्या लक्षात राहण्यासारखे आहे. जणू लोकांची उपस्थिती ही बुस्टर डोससारखी असून आगामी कार्यकत्यांनी निवडणुकीसाठी जोमाने काम करावे, असे आवाहन केले. शिंदे अध्यक्षपदावरून म्हणाले, वैचारिक तत्वावर म्हेत्रेंनी तालुक्याचा विकास केला. म्हेत्रेंनी सोलापूर-गाणगापूर रस्त्याबाबत माझ्यासोबत दिल्लीत पाठपुरावा केल्यामुळे तालुक्याला झाल्याचे सांगितले. फायदा त्यांना जनतेची कामे करण्याचे वेड आहे. हुकूमशाही ठरलेल्या मोदी शासनाला धडा शिकविण्यासाठी आगामी निवडणुकीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. सहकार्य सत्काराला उत्तर देताना सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, मी तीन वेळा वाचलो आहे. त्यामुळे जनतेसाठी यापुढील आयुष्य समर्पित आहे. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आणि भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे मी घडलो. म्हणून जनतेची सेवा करू शकलो. यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
२००९ च्या निवडणुकीत माझा पराभव झाला पण वर सरकार आमचे आले. त्यावेळी आमच्यासाठी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आहेत, अशा प्रकारचे बळ या मंत्र्यांनी दिल्याचा उल्लेख म्हेत्रे यांनी भाषणात केला. यावेळी अश्पाक बळोरगी, श्रीशैल नरोळे, मल्लिकार्जुन काटगाव, शिवराज स्वामी, लाला राठोड, रईस टिनवाला, महेश वानकर, सभापती आनंद सोनकांबळे, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अरूण जाधव, सातलिंग शटगार, मोहन देडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगल पाटील, शहराध्यक्ष सुनीता हडलगी, प्रकाश हिप्परगी, व्यंकट मोरे, विश्वनाथ भरमशेट्टी आदींसह तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार संजय इंगळे यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments