Hot Posts

6/recent/ticker-posts

इतर मागास ,बहुजन कल्याण मंञालया कडून नविन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाना मान्यता - इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

इतर मागास ,बहुजन कल्याण मंञालया कडून नविन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाना मान्यता -  इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई (नासिकेत पानसरे) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आज नविन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्री श्री.विजय वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नविन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ५६ व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर ११ हे कृषीविषयक अभ्यासक्रम आहे.त्यास आज महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली. जे विद्यार्थी इतर मागास,विमुक्त जाती ,भटक्या जमाती,विशेषमागास प्रवर्गात मोडतात व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे  तो विद्यार्थ्यी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल.तसेच सदरचा विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यातील शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

            मागास वर्गीय,ओबीसी ,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना रोजगार , स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावे व रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने  इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी संपूर्ण ६०५ कोर्सेस होते आता एकूण ७३६ कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.त्यात  २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ कोर्सेस नव्याने सुरु केल्याची माहिती  यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली. 

Reactions

Post a Comment

0 Comments