Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी विभागात ३० टक्के रिक्त पदं कृषी मंत्र्यांची कबुली

कृषी विभागात ३० टक्के रिक्त पदं कृषी मंत्र्यांची कबुली

           मुंबई, (नासिकेत पानसरे) :-  कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तीस टक्के पदं रिक्त असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात त्याची माहिती देताना ते बोलत होते.

           कृषी विभागात तीस टक्के रिक्तपदं आहेत या बाबत  विचारता ते म्हणाले की, जरी रिक्त पदं असली तरी ज्या ठिकाणी पद रिक्त आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पदभार देऊन कामकाज सुरळीतपणे चालू आहे. रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

           राज्यात कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तसेच कृषी उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कोरोना काळात हे पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते. अशी माहिती त्यांनी दिली.

           सन २०१७,२०१८,२०१९ या वर्षाचे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित नाशिक येथे होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments