Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरपीआय - भाजपची युती केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरपीआय - भाजपची युती केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

             बेळगाव (नासिकेत पानसरे) : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) व भाजप युती संदर्भात लवकरच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय समाज कल्याण रामदास आठवले यांनी सांगितले. आरपीआयच्या राज्य कार्यकारणीची आज  सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सुरवातीला आठवले यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. नंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे राज्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

             मंत्री आठवले म्हणाले,‘‘देशात कॉंग्रेस पक्षाची ७० वर्षे सत्ता होती. तरीही देशाचा विकास अपेक्षित घडला नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार झाले नाही. जाती व्यवस्था आणि अस्पृषता कायम आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला. दलित, अल्पसंख्याकांना व्होट बॅंक म्हणून पाहिले. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी धुरा सांभाळलीनंतर भ्रष्टाचारावर अंकुश राहिला. विकासाला गती मिळाली. यामुळे आरपीआय पक्ष भाजपसोबत असेल.’’

             मंत्री आठवले म्हणाले,‘‘पक्ष संघटनेला बळकटी द्या. पक्षाची ताकद वाढवली जावी, त्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणी केली जावी. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून पक्षासाठी कार्यरत असावे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निवड संदर्भात निर्णय घेताना आरपीआय पक्षाला विश्‍वासात घ्यावे, यासंदर्भात चर्चा कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी आगामी कालावधीत करणार आहे.’’यावेळी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष डॉ. एम. वेंकटस्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मल्लेश चौगुले, श्रवण कांबळे, लकाप्पा तळवार, शंकर अजमनी, बसवराज डाके, महादेव तळवार, शिवा चौगुले, दिलशाद ताशिलदार, अजीत हरिजन, दिवानसाब देसाई, हसिना शेख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments