महामानवांच्या जयंतीनिमित्त रिपाइंचे रक्तदान करून अनोखे अभिवादन

109 रक्तदात्यांनी केले उस्फुर्त रक्तदान
लऊळ(कालीदास जानराव):क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,जगतज्योती महात्मा बसवेश्वर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मोडनिंब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)व मा.नागनाथ नाना ओहोळ मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय मोडनिंब येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.राज्यभरात सुरू असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सदर रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते नागनाथ ओहोळ,सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, उपसरपंच दत्ता सुर्वे,माजी सरपंच बाबू सुर्वे,दत्ता सुर्वे,कैलास तोडकरी,चांगदेव वरवडे,वैभव मोरे,वैभव ओहोळ,प्रशांत गिड्डे, दत्ता ओहोळ,महेश कांबळे,दत्ता माने,विश्वास ताकतोडे, चंद्रकांत गिड्डे यांच्यासह सर्व आर.पी.आय माढा तालुका अध्यक्ष अमर बडेकर यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमास स्वप्निल ओहोळ ग्रा.पं.सदस्य अतुल गाडे,लखन लंकेश्वर,गोविंद सरवदे,गणेश ओहोळ,मलंग ओहोळ,नितीन ओहोळ,कुर्मदास थोरात,हर्षद ओहोळ,सुरेश लंकेश्वर,भास्कर ओहोळ,गणेश माने,लखन गाडे, गणेश गायकवाड,विजय ओहोळ, रमेश ताकतोडे,देविदास साळुंखे, भूषण सुतकर,प्रशांत डीकरे, वैभव माळी,अविनाश भडकवाड, दिनेश नाईक,अमोल वाघमारे, निखिल नीचाळ,मंगेश माने,खंडू माने,महेश कांबळे,चंद्रकांत माने, लोकेश ताकतोडे,शिवा पाटोळे, सुरेश ताकतोडे,सुरेंद्र शिंदे, अतिश ओहोळ,नारायण वाघमारे, यांच्यासह संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते.या उपक्रमासाठी माननीय नागनाथ नाना ओहोळ मागासवर्गीय बहुउद्देशीय समाज सेवी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एन.जी.नाना ग्रुपचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते नागनाथ ओहोळ यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments