सरपंच मारहाण प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

लऊळ (कटूसत्य वृत्त):-सरपंचांस मारहाण करत पैसे काढून घेतल्याप्रकरणी बार्शी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर करून प्रकरणातील आरोपीची सुटका करण्यात आली रामेश्वर राऊत सोमेश्वर राऊत या दोघांना जामिनावर सोडण्यात आले.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मानेगाव(ता.माढा) येथील सरपंच तानाजी धनाजी लांडगे यांना प्रकरणातील आरोपींनी केबलच्या वायरने जखमी करून मारण्यासाठी चाकू बाहेर काढला व खिशातील सात हजार तीनशे रुपये तसेच आधार कार्ड काढून घेतले या घटनेची फिर्याद १५ मार्च २०२२ रोजी माढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यावर आरोपी रामेश्वर राऊत व सोमेश्वर राऊत याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केला यावर आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲड.कल्याण वाळुजकर मंगेश देशमुख योगेश साठे तर सरकारपक्षातर्फे ॲड.कदम यांनी काम पाहिले.
0 Comments