राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र संतोष पवार यांना प्रदान करण्यात आले आहे. ही निवड झाल्यानंतर पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर नवी जबाबदारी म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय जयंत पाटील, सन्मानीय शिवाजीराव गर्जे यांनी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. नव्या जबाबदारीचा मी मनःपूर्वक स्वीकार केला आहे. मी यापुढील काळातही साहेब, दादा आणि ताई यांचा विचार आणखी बळकट करेन. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहीन असे शेवटी संतोष पवार म्हणाले.
0 Comments