Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉल्बीला परवानगी नाहीच; मध्यवर्ती स्वतःच्या जबाबदारीवर काढणार मिरवणूक

 डॉल्बीला परवानगी नाहीच; मध्यवर्ती स्वतःच्या जबाबदारीवर काढणार मिरवणूक

                                                                       

                              

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सव मिरवणुकीसाठी सोलापुरात डॉल्बी साऊंड सिस्टिम लावण्यावरून पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. पोलिस आयुक्तांनी बोलावलेली बैठक फिस्कटली होती, त्यानंतर आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समिती आणि जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ यांनी आंदोलनाची हाक दिली.धरणे आंदोलन करण्यात आले, मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला, मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले. तरीही पोलीस प्रशासन परवानगी देत नव्हते. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना फोनवरून परवानगी देण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान पोलीस प्रशासनाने उपायुक्त बापूसाहेब बांगर यांच्या सहीने शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती व विश्वस्त समिती च्या नावाने पत्र काढून मिरवणुकीचा परवाना दिला आहे.मात्र दिवसा आणि रात्री आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामध्ये दिवसात 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल इतका आवाज मर्यादेत राहील अशा सूचना पोलिस प्रशासनाने केल्या आहेत.17 एप्रिल रोजी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी असेल, 12 नंतर सर्व ध्वनिक्षेपक बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजा सरवदे राजा इंगळे राहुल सरवदे सुबोध वाघमोडे  उत्सव अध्यक्ष अजित गायकवाड यांना बैठकीला बोलावले होते ही बैठक पोलीस आयुक्तांकडे झाली. पोलीस आयुक्तांच्या या बैठकीचा निर्णय गुलदस्त्यातच आहे. राजा सरवदे म्हणाले आता केवळ एक दिवस शिल्लक आहे सोलापूर शहरातील तब्बल 400 हून अधिक मंडळांत पर्यंत मिरवणुकीची सूचना द्यायचे आहे आता विश्वस्त समिती आपल्या जबाबदारीवर ही मिरवणूक जल्लोषात उत्साहात आणि शांततेत तसेच कोणतेही गालबोट न लागता काढणार आहे. दरम्यान काही वेळाने महामंडळाचे आनंद चंदनशिवे रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे असे प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले  पोलिस आयुक्तांच्या चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय झाल्याचं सांगत पोलीस आयुक्तांनी आमचे तोंड गोड करून पाठवल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले.
पोलिसांनी पुन्हा कारवाई करत 32 बेस, 30 टॉप, 24 अॅप्लीफायर, 1 बॅंजो, 13 वाहने केले जप्त

दि. १३/०४/२०२२ रोजी पासून ‘अ’ व ब सत्रात विशेष नाकाबंदी नेमण्यात आलेली आहे. सदर नाकाबंदी दरम्यान १३ वाहने, ३२ बेस, ३० टॉप, २४ अॅप्पलीफायर व १ बॅन्जो वाहन ताब्यात घेण्यात आले आहेत.



Reactions

Post a Comment

0 Comments