बाळे भागातील चार जण तडीपार ; पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचा आदेश
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने संघटीतरीत्या टोळी प्रस्थापीत करुन टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, हॉस्पीटलमध्ये दंगा करुन तोडफोड करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या १ सौदागर शहाजी क्षिरसागर, वय-३३ वर्षे, रा. समर्थ नगर, बाळे, सोलापूर. २. सोमनाथ हणुमंत सर्वगोड, वय २७ वर्षे, रा. भिमनगर, वाळे, सोलापूर, ३. विलास रमेश कवडे, वय-३५ वर्षे, रा. मारुती गल्ली, वाळे, सोलापूर, ४. सागर कलप्पा तोडकरी, वय-३४ वर्षे, रा. वाणी गल्ली बाळे सोलापूर या टोळीतील इसमांना सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून सहा महिने या कलावधीकरती तडीपार करण्यात आले आहे. तसेच यापुढे डॉक्टरांवर/हॉस्पीटलवर हल्ला करणा-या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असा आदेश पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी काढला आहे.
0 Comments