एसटीचे 46 हजार 462 कर्मचारी कामावर हजर
.png)
एसटी कामगारांनी ड्यूटीवर हजर झाल्यास त्यांच्यावरील सर्व कारवाई मागे घेण्यात येईल असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
28 ऑक्टोबरपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरू असून राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटली जाणारी एसटी सेवा ठप्प झाली आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने एसटी कामगारांना 22 एप्रिलपर्यंत ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश दिले होते. ड्यूटीवर हजर झाल्यास निलंबन, बडतर्फी आणि सेवासमाप्तीचे आतापर्यंतच्या झालेल्या सर्व कारवाई मागे घेण्यात येतील असाही दिलासा न्यायालयाने कामगारांना दिला आहे. त्यामुळे कामगारांनी हळूहळू कामावर हजर होण्यास सुरूवात केली आहे.
आज 1564 कामगार रूजू झाले असून एकूण 46 हजार 462 कर्मचारी हजर झाले आहेत. 13 एप्रिल रोजी 40 हजार 219 कर्मचारी हजर झाले होते. त्यात प्रशासकीय विभागाचे 11 हजार 179 कर्मचारी, कार्यशाळेचे 10 हजार 416 कर्मचारी , ड्रायव्हर 9 हजार 413 आणि कंडक्टर 9 हजार 211 यांचा समावेश होता.
0 Comments