Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरासाठी आजपासून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार- धीरज साळे

 सोलापूर शहरासाठी आजपासून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार-  धीरज साळे

नऊदिवस सहाहजार क्युसेक्सने पाणी प्रवाह असणार

बेंबळे (कटूसत्य वृत्त):- शनिवार दिनांक 16 एप्रिल (आज पासून) उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून दिनांक 25 एप्रिल पर्यंत हे पाणी नदीतून सुरू राहील अशी माहिती जलसंपदा विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे. दरम्यान आज १५ एप्रिल रोजी उजनी धरणात 53 टक्के पाणी असून एकूण 92 टीएमसी पाणीसाठा आहे ,त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्यात पिण्यासाठी, शेती व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही असे जलसंपदा विभागाचे योग्य नियोजन आह.अधिक माहिती देताना धीरज साळे म्हणाले की सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसवण्यात आले आहेत, त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी 26 किंवा 27 एप्रिलपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे.  सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांनी 25 एप्रिल पर्यंत टाकळी बंधाऱ्यात पाणी आले पाहिजे असे पत्राद्वारे जलसंपदा विभागाला कळवले आहे, या नियोजनानुसार शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी धरणातून वीज निर्मिती केंद्रा मधून १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी पुढे नदीप्रवाह येते .त्यानंतर 17 एप्रिलच्या सकाळपर्यंत धरणाच्या चार दरवाज्यातून ४४०० क्युसेक्स पाणी भीमा नदी प्रवाहात सोडण्यात येणार आहे व अशाप्रकारे एकूण ६ हजार क्‍युसेक पाणी आठ ते नऊ दिवस नदी प्रवाहात राहणार आहे .हे प्रवाही पाणी 23 किंवा 24 एप्रिल पर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल व 25 एप्रिल पर्यंत टाकळी व चिंचपुर बंधारे पुर्ण क्षमतेने भरतील व पुरेसा पाणीसाठा होईल व त्यामुळे सोलापूर शहराला नियोजनाप्रमाणे  व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यात येईल असे समजते. दरम्यान या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील अनेक गावे व वाड्या- वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची चांगली सोय होणार आहे. याचप्रमाणे भीमा नदीवर असलेले को.प.चे १७ बंधारे या पाण्यामुळे भरून निघणार असून बागायती शेतीसाठी चांगली सोय होणार आहे. सध्या उजनी धरणातून कालवा, बोगदा, सिना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा 92 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 28 टीएमसी आहे त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्याला कोणत्या प्रकारचे पाणी कमी पडणार नाही असे धरण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात येते.

15 एप्रिल रोजी उजनी धरणाची स्थिती...

   पाण्याची पातळी... 494.525 मीटर

एकुण साठा.....2618. 36 दशलक्ष घन मीटर

                       92.46 टीएमसी

उपयुक्त साठा... 815.55 दशलक्ष घन मीटर

                        28.80 टीएमसी

टक्केवारी ........53.75% टक्के

धरणातून विसर्ग ......

       कालवा...... 3000 क्युसेक्स

भीमा-सीना जोड बोगदा.....900 क्युसेक्स

सीना-माढा सिंचन योजना 296 क्युसेक्स

दहिगाव उपसा सिंचन योजना 105 क्युसेक्स बाष्पीभवन 7.32 मिलिमीटर  


Reactions

Post a Comment

0 Comments