कमलापूर येथे भारतरत्न, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सालाबाद प्रमाणे याही वर्षी कमलापूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला जगाचे शांतिदूत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब अनुसे व नितीन काळे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.त्यानंतर पंचशील ध्वजाचे कमलापूर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.कलावती बंडगर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर निळ्या ध्वजाचे अनावरण उपसरपंच देवीदास ढोले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तैल चित्रास ग्रामपंचायत सदस्य मधुकर तंडे यांच्या हस्ते व सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार समर्पित करण्यात आला. सुरुवातीला दत्तात्रय म्हमाणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.एन.डी.बंडगर यांनी धडाकेबाज मनोगत व्यक्त करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ऐवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.युवा नेते डॉ.सतीश तंडे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ अण्णा अनुसे, दलित चळवळीचे दीपक ऐवळे,ज्येष्ठ मार्गदर्शक सदाशिव म्हमाणे,धनश्री चंदनशिवे,तसेच बाल चिमुकल्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित अजनाळे गणाची नेते विजय अनुसे, श्रीकांत अनुसे,पांडुरंग काळे, नवनाथ शेंबडे,दामोदर भंडारे, संजय अनुसे सर, माजी सरपंच सदाशिव ऐवळे, कुमार जाधव, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष- बाळू रानापा चंदनशिवे, उपाध्यक्ष-प्रफुल दामू चंदनशिवे, सेक्रेटरी-राजेंद्र सोपान चंदनशिवे, सहसेक्रेटरी- संजय सिद्राम चंदनशिवे,खजिनदार- सूर्याजी दाजी चंदनशिवे,सल्लागार- बाळू पिराजी चंदनशिवे पिंटू सिद्राम चंदनशिवे, रुनील यमाजी चंदनशिवे, विनोद राणाप्पा चंदनशिवे, सखाराम अर्जुन सावंत, भारत कच्चु चंदनशिवे,सतीश तुकाराम चंदनशिवे,निलेश सिद्धार्थ चंदनशिवे,अमोल (दादा) चंदनशिवे,भानुदास सयप्पा चंदनशिवे,शंकर बापू चंदनशिवे, राहुल बाबासाहेब चंदनशिवे, विजय केशव चंदनशिवे,आकाश अरुण चंदनशिवे,दिलीप रायाप्पा चंदनशिवे,तानाजी दाजी चंदनशिवे. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर नामदेव तुकाराम चंदनशिवे,विशंभर सर्जेराव चंदनशिवे, दत्तात्रय ऐवळे,रघुनाथ ऐवळे,तसेच सर्व महिला भगिनी,लहान बालक,तरुण मित्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धडाकेबाज नेतृत्व प्रदीप चंदनशिवे यांनी केले.
0 Comments