Hot Posts

6/recent/ticker-posts

सदर बझार पोलिसांनी दहा दुचाकी एका चोराकडून जप्त केल्या

 सदर बझार पोलिसांनी दहा दुचाकी एका चोराकडून जप्त केल्या

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मीटर गेज रेल्वेच्या पडक्या इमारतीमधून चार, मोदी स्मशानभूमी जवळील झुडुपातून चार आणि इतर ठिकाणांहून दोन असे एकूण दहा मोटारसायकली सदर बझार पोलिसांनी जप्त केल्या. योगीनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे (जम्मा वस्ती, भवानी पेठ) याला मोदी स्मशानभूमीजवळून जाताना अटक झाली. याशिवाय निरगुडे याने मोदी स्मशानभूमीच्या जवळील एका काटेरी झुडपात चार व रेल्वेच्या पडक्या खोलीत चार मोटारसायकली लपवून ठेवण्याचे सांगितले. 

          निरगुडे याने सोलापूर शासकीय रुग्णालयातून ४ एप्रिल २०२२ रोजी दुचाकी चोरली होती. ती दुचाकी घेऊन तो मोदी स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जाताना सदर बझार पोलिसांनी त्याला संशयावरून अटक केली. स्वप्नील चंदनशिवे यांनी सदर बझार पोलिसात ४ एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. चोराकडून एमएच १३, एआर ६७०४ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याही जप्त केल्या आहेत.जानेवारी महिन्यात नवी पेठेतील अॅड. धनंजय माने यांच्या घराजवळून एक दुचाकी चोरली होती. ती पेट्रोल संपल्यामुळे देगाव नाका येथे सोडून गेला होता. नागरिक आणि सलगर वस्ती पोलिसांच्या मदतीने ती दुचाकी पोलिसात जमा आहे. १० दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.सदर बझार पोलिसांनी दहा दुचाकी एका चोराकडून जप्त केल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments