बहुजन दलित महासंघाच्या वतीने 16 एप्रिल रोजी रस्ता रोको आंदोलन

अपघात प्रवण क्षेत्र असलेला थेऊर ते थेऊर फाटा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद करणे बाबत
थेऊर (प्रविण शेंडगे) : पुणे सोलापूर महामार्ग वरून थेऊर कडे येणारा रस्ता नादुरुस्त आहे. या रस्त्याचा वाद कोर्टामध्ये सुरु असून मे. न्यायालयाच्या आदेशाने या रस्त्यावरील काम काही काळासाठी स्थगित केले आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत तशाही अवस्थेत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे थेऊर गावांमध्ये वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्याच बरोबर छोटे-मोठे अपघात होत असतात.
मागील आठवड्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा जाग्यावर मृत्यू झाला आहे. भविष्यात असे अपघात होऊ नये.त्यामुळे रस्ता दुरुस्त होईपर्यंत या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी पुणे व पोलीस आयुक्त पुणे यांना बहुजन दलित महासंघाच्या वतीने दिनांक ०६ एप्रिल रोजी देण्यात आले होते व या निवेदनाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी. अन्यथा १४ एप्रिल नंतर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता .आज पर्यंत माननीय जिल्हाधिकारी अथवा वाहतूक विभाग यांच्याकडून जड वाहतूक बंद करावी. याबाबत कोणतीही उपाय योजना झालेली नाही. अथवा आदेशही दिलेले नाहीत त्यामुळे संघटनेचे वतीने दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ११वाजता थेऊर ते थेऊरफाटा रस्ता जड वाहतुकीस बंद करावा यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत आंदोलनास परवानगी मिळावी. यासाठीचे निवेदन लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी मोकाशी साहेब यांना दिले आहे.
या आंदोलनामध्ये मृतांच्या कुटुंबीय ,थेऊर ग्रामस्थ व संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत अशी माहिती बहुजन दलित महासंघ संघटनेचे अध्यक्ष आनंद वैराट यांनी दिली.
0 Comments