Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा वेल्फेअर फाउंडेशन व नाम फाऊंडेशन चा उपक्रम, सोलापूर जिल्ह्यातील ३० आत्महत्या ग्रस्त शेतकर्याना ७ लाख ५० हजांराची मदत

 माढा वेल्फेअर फाउंडेशन व नाम फाऊंडेशन चा उपक्रम, सोलापूर जिल्ह्यातील ३० आत्महत्या ग्रस्त शेतकर्याना ७ लाख ५० हजांराची मदत 

          माढा  (कटूसत्य वृत्त):- पतीच्या निधनानंतर ही न डगमगता  मोठ्या जिद्दीने परिस्थितीचा सामना करुन जीवन जगणाऱ्या सोलापूर  जिल्ह्यातील ३० आत्महत्या ग्रस्त कुटूबियांना ७ लाख ५० हजारांची आर्थिक मदत देण्याचा उपक्रम माढा वेल्फेअर फाउंडेशन व नाम फाऊंडेशन च्या माध्यमातुन राबविण्यात आला.

          निंमगाव(टे) येथे विठ्ठलगंगा फार्मर्स निर्यात प्रकल्पाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमास माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील,माढा वेल्फेअर फौंडेशन चे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत धनादेशाचे  वाटप शेतकरी कुटूबियांना करण्यात आले. प्रत्येक कुटूबियांना २५ हजांराची मदत देण्यात आली.संदीप शिंदे यांनी प्रास्ताविकातुन माढा वेल्फेअर फाउंडेशन च्या कामाचा आढावा मांडला.

          तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले,आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियाना या उपक्रमातून जगण्याच बळ मिळण्या बरोबरच समाधान देणारी आणि सुखावणारी गोष्ट असल्याचे सांगुन सामाजिक संस्थानी या उपक्रमाचे अनुकरण करण्याचे आवाहन करीत माढा वेल्फेअर च्या कार्याचे कौतुक केले.

          गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील म्हणाले,गोरगरीब शेतकर्याना यामुळे आर्थिक भरारी मिळणार असुन त्यांना या मदतीतुन दहा हत्तीच बळ लाभले असल्याचे सांगुन माढा वेल्फेअर फाउंडेशन  समाज उपयोगी नाविन्य पुर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच  अग्रेसर आहे.

          आत्महत्याग्रस्त कुटूबियांना आर्थिक मदत देऊनच आम्ही थांबणार नसुन या ३० शेतकर्या मधील ५ शेतकर्याना  रहायला घरच नाही.अश्यांनासाडे साडे पाच लाख रुपये देऊन घर उभारणी बरोबरच  जनावरांचा गोठा उपलब्ध करुन देणार असुन  इतर महिलांच्या हाताला देखील रोजगार निर्मिती च्या दृष्टीने प्रकल्प उभारणार असल्याचे माढा  वेल्फेअर चे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी बोलताना सांगितले.आत्महत्याग्रस्त  शेतकरी कुटूबांतील निर्मला कोळी,रंगनाथ टोळे यांनी मिळालेल्या मदतीबद्दल आभार मानुन  वेदना मांडल्या.

          यावेळी भारत शिंदे,जयंत पाटील,धनाजी जवळगे,पंडीत भोसले,यशोदा ढवळे,वैशाली पाटील,शहाजी शिंदे,सुरेश बागल,श्रीकांत पाटील,रविंद्र शिंदे,शशिभाऊ शिंदे, नितीन कापसे,महेश डोके,युवराज शिंदे,महेश मारकड,केशव आवटे,संदीप गोरे,गौरव पाडुळे,सुजित भोसले,शरद घाडगे,अजित पाटील आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन रविंद्र शिंदे यांनी तर आभार धनराज शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माढा वेल्फेअर फाउंडेशन चे पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments