मुंबई पोलीस दलाला बदनाम करायचे... अधिकार्यांचे... कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरणाचा डाव नवनीत राणा यांचा होता - महेश तपासे

मुंबई(नासिकेत पानसरे):-मागसवर्गीय असल्याने पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा जातीयवादी आरोप करून मुंबई पोलीस दलाला बदनाम करायचे... अधिकार्यांचे... कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा नवनीत राणा यांचा डाव होता असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी करताना याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर महेश तपासे यांनी नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पोलीस ठाण्यात चहापान करत असल्याचे एक व्हिडिओ समोर आला असून जातीच्या नावावर खोटी तक्रार करणार्या नवनीत राणा यांच्यावर लोकसभा अध्यक्ष कोणती कारवाई करणार आहे असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.
0 Comments