राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्या वाटप

वेळापुर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वेळापुर येथे शालेय विद्यार्थाना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. १ ते १९ वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर चावून खाण्याच्या जंतनाशक गोळ्या निःशुल्क देण्यात आल्या.वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वाडी येथील १६२ विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कुल शिवशंभो प्रशाला येथे ४० विद्यार्थी, काशीद वस्ती अंगणवाडी येथे ५३ विद्यार्थी, पारधे वस्ती अंगणवाडी येथे ४१ विद्यार्थी, मुंगूसकर वस्ती अंगणवाडी येथे ३३ विद्यार्थ्यांना या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. दोन मोठ्या शाळा तर ३ अंगणवाड्या मिळून एकूण ३२९ लाभार्थ्यांनी या जंतनाशक गोळ्यांचा लाभ घेतला.हे अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आशा सेविका गंगा दाजी खुडे, अंगणवाडी मदतनीस लोंढे, सेविका नंदादेवी भोसले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments